मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे गट नवीन सरकार स्थापन करणार आहेत. त्यासाठी आज संध्याकाळीच 7 वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळतेय. राजभवनावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. यापूर्वी 1 जुलै रोजी शपथविधी कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता, मात्र आता नवीन अपडेटनुसार शपथविधी आजच संध्याकाळीच होणार आहे.
गोव्यात मुक्कामी असलेले एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वीच मुंबईत दाखल झाले. यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी पोहोचले. सागर बंगल्यावर रविंद्र चव्हाण, पराग अळवणी, मंगलप्रभात लोढा, उदयनराजे भोसले हे भाजपचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत. तिथून हे सर्वजण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करतील.
हे पण वाचा :
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचे ट्विट ; म्हणाले..
अमिषा पटेलने केला बोल्ड Video शूट ; पाहून चाहत्यांना फुटला घाम
मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी भरती, दहावी उत्तीर्णांना संधी..
त्यानंतर आज संध्याकाळी ७ वाजता भाजप सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करतील, असे सांगितले जाते. चंद्रकांत पाटील हेदेखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, असं सांगितलं जात आहे.