मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करत त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य आहे. एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वतःचं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो!, असं ते म्हणाले.
गेल्या दोन महिन्यापूर्वी राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. मात्र सध्याच्या राजकीय गोंधळात त्यांची प्रतिक्रिया आली नाही. आता महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर त्यांनी निशाणा साधला आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
राज ठाकरे यांचे ट्विट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला आणि पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्यास सांगितले. ठाकरे मर्सिडीज कार चालवत राजभवन गाठले होते.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी रात्री उध्दव ठाकरे यांच्या रूपाने एक समंजस आणि सभ्य मुख्यमंत्री गमावला, ज्यांनी कृपापूर्वक पायउतार झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले की, मला “नंबर्स गेम” मध्ये रस नाही आणि म्हणूनच मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. राऊत यांनी ट्विट केले की, “मुख्यमंत्री यांनी कृपापूर्वक पद सोडले आहे. आपण एक समंजस आणि सभ्य मुख्यमंत्री गमावला आहे.