या अनुषंगाने समिती स्थापन करण्यात आलेली असून सदर समितीमार्फत खालीलप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
१) रस्ते अपघातात जख्मी व्यक्तींनी Golden Hour या काळात तात्काळ मदत करुन जी व्यक्ती अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करेल अशा व्यक्तींना प्रोत्साहनपर बक्षिसाची रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात येईल केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालय, नवी दिल्ली यांनी सदर योजना कार्यान्वीत केली असून अशा व्यक्तींची जिल्हास्तरावर निवड करणेकामी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देष प्राप्त झाले आहेत.
२) त्यानुसार अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीची गुड सॅमेरिटन निवड करण्याकामी खालील प्रमाणे समिती स्थापन करण्यात येत आहे.
अध्यक्ष – जिल्हाधिकारी, सदस्य- जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकीत्सक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी , सदर योजना ही दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू असणार असून, या योजनेमागे रस्ता अपघातातील अपघातग्रस्तांना अपातकालिन परिस्थितीत तात्काळ मदत करण्याकामी नागरिकांना प्रोत्साहीत करुन निष्पाप व्यक्तीचे प्राण वाचविणे हाच एकमेव हेतू आहे.
३) गुड सॅमेरिटन (जीवनदुत) – व्याख्या – अशी व्यक्ती जी रस्ता अपघातात समावेश असलेल्या अपघातग्रस्तांना गोल्डन अवर काळात आपातकालिन परिस्थितीत मदत करुन वेळीच वैद्यकीय उपचार मिळण्याकरीता त्यांना नजिकच्या इस्पीतळात दाखल करेल,
४) Golden Hour – व्याख्या – मोटार वाहन कायदा कलम –२ (१२A) नुसार गोल्डन अवर म्हणजे व्यक्तीस गंभीर जखम झाल्यानंतरचा पुढील एक तास ज्यामध्ये अतितात्काळ व योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यास एखाद्याचा प्राण वाचवू शकतो.
५) फेटला अपघात – व्याख्या – असा अपघात ज्यामध्ये वाहनातील अपघातग्रस्तांना खालीलबाबतीत उपचार झालेले असतील, मोठी शस्त्रक्रिया झालेली असल्यास, किमान ३ दिवस भर्ती असलेले रुग्ण, मेंदूला दुखापत, मनक्याला दूखापत,
१) निवड प्रक्रिया गुड सॅमेरिटन – अपघात ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेला असेल व त्या अपघातात एखाद्या व्यक्तीने अपघातग्रस्तांना मदत केलेली असेल अशा व्य्क्तींचे संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता अपघाताची वेळ व स्थळ आणि त्या व्यक्तीने कशाप्रकारे अपघातग्रस्तांना मदत केली याविषयीचा तपशिलाबाबतचा अहवाल संबधित पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांनी उपरोक्त समितीपुढे सादर करावा.
२) एखाद्या अपघातात मदत करणाऱ्या व्यक्तीने अपघातग्रस्तांना थेट इस्पीतळात दाखल केलेले असेल तर अशा प्रकरणात हॉस्पीटल प्रशासनाने सदरची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला लेखी कळवावी, संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी याबाबत दखल घेवून मुद्दा क्र. १ च्या तपशिलानुसारच अहवाल उपरोक्त समितीपुढे सादर करावा.
३. निवड समिती दरमहा या प्रमाणे समितीसमोर सादर झालेल्या प्रस्तावावर चचौ करुन त्या व्यक्तीची निवड करुन त्या व्यक्तीस पाच हजार रुपये बक्षिस म्हणून देता येईल. एखादया अपघातात एक पेक्षा जास्त व्यक्तींनी मदत केलेली असल्यास ती रक्कम समान वाटप करुन देण्यात येईल.बक्षिस रक्कम देतांना सोबत प्रशस्तीपत्र देण्यात येईल (Certiflcate of appreciation )
४) निवड समिती दरमहा निवड झालेल्या व्यक्तींची यादी शिफारशीसह मा. परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुबंई यांना पाठवतील, प्रस्ताव पाठवितांना संबंधित व्यक्तीच्या बँकखातेबाबतचा तपशिल पाठविण्यात येईल जेणेकरुन बक्षिसाची रक्कम त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होईल.
५) दरवर्षाच्या ३० सप्टेंबर अखेर राज्यस्तरीय निवड समिती गुणवत्तेच्या आधारे कमाल तीन प्रस्ताव केंद्र शासनास पाठवतील सर्व राज्यामधून आलेल्या पहिल्या १० व्यक्तींची निवड केंद्र शासनामार्फत केली जाईल व त्यांना प्रत्येकी एक लाख रु. प्रमाणपत्र व ट्रॉफी दिली जाईल.
६) गुड सॅमेरिटन – व्यक्तीची निवड प्रक्रिया पार पाडतांना त्या व्यक्तीबाबत प्राप्त झालेली माहिती ही फक्त याच निवड प्रक्रियेकरीता वापरली जाईल इतर कोणत्याही कामकाजाकरीता सदरची माहितीचा उपयोग करता येणार नाही. तसेच एखाद्या व्यक्तीस त्याची माहिती प्रकट करावयाची नसल्यास अशा व्य्क्तीस सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही. कोणत्याही एका व्यक्तीस वर्षातून जास्तीत जास्त पाच वेळा सदर योजनेचा लाभ घेता येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.