जळगाव : काल सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर स्थानिक निवडणुका घेण्याचे आदेश ठाकरे सरकारला दिले आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. अशातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला आहे.
मराठा ओबीसी आरक्षणाबाबत एकमेकांचे भांडण लावण्याचे काम फडणविसांनी केले तुमच्या पाच वर्षाच्या काळात हा प्रश्न सुटू शकला नाही आता त्यावर तुम्ही का प्रतिक्रिया देतात? असा सवाल करत खडसे यांनी टीका केली.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर स्थानिक निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. या निकालानंतर भाजपने ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे.त्याचवेळी एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीने दोन वर्षात काय केलं तर महाविकास आघाडीने विधानमंडळात ओबीसी आरक्षणाबाबत कायदा केला.
मात्र मागच्या पाच वर्षात फडणीसांनी काय केले? ओबीसींना आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीसांनी जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत वेगवेगळी भूमिका घेतली. मराठा ओबीसी आरक्षणाबाबत एकमेकांचे भांडण लावण्याचे काम फडणविसांनी केले. तुमच्या पाच वर्षाच्या काळात हा प्रश्न सुटू शकला नाही आता त्यावर तुम्ही का प्रतिक्रिया देतात? असा टोलाही खडसेंनी फडणवीसांना लगावला.
ओबीसी आरक्षण याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे. ओबीसींचे आरक्षण हे घटनेने दिलेले आरक्षण आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींवर अन्याय होणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षण घालवण्याचा मागचा प्रयत्न आहे. चंद्रकांत पाटील आज महाविकासआघाडीवर हल्ला करत आहेत मात्र मागच्या सरकारच्या काळातही ओबीसींचा प्रश्न तसाच होता, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली