ललितपूर : देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना दिसत आहे. अशातच उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथील ललितपूर (Lalitpur) जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्याच्या स्टेशन प्रभारीवर एका सामूहिक बलात्कार (gang rape) पीडितेने बलात्काराचा आरोप केला आहे. यानंतर स्टेशन प्रभारीला निलंबित करण्यात आले आहे. तर तो सध्या सध्या फरार आहे.
काय आहे प्रकरण?
22 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चार तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडितेने न्याय मिळावा म्हणून पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र न्याय मिळण्याऐवजी तिला छळालाच बळी पडावे लागले. तिथे उपस्थित स्टेशन प्रमुख टिळकधारी सरोजनेही तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने आपली कहानी एसपींना सांगितली आणि त्यानंतर ही कारवाई केली जात आहे.
ललितपूर पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांनी या प्रकरणात स्टेशन प्रमुख टिळकधारी आणि इतरांविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आले आहेत. मात्र, आरोपी पोलीस अधिकाऱ्याला अटक होणे बाकी आहे. ललितपूरचे एसपी निखिल पाठक यांनी सांगितले की, आम्ही एका आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी करत आहोत. स्टेशन प्रमुख टिळकधारी निलंबित असून तो गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी आम्ही पथके तयार केली आहेत. एका एनजीओने मुलीला माझ्या कार्यालयात आणले. यानंतर मुलीने सर्व प्रकार सांगितला.