कोरोना संसर्ग वाढीने पुन्हा एकदा डोकेदुखी वाढवली असून सर्व उपाय करूनही चीन मध्ये कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याने चीनच्या २६ शहरांत अंशत:, अर्ध व काही ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन लागले आहे.तसेच चीन देशातील झिजिंगयान, जिलिन, शांघाय, बीजिंगसह ८ प्रांतांत गेल्या २ महिन्यापासून शाळा बंद आहेत. दिवसेंदिवस ओमायक्रॉनमुळे रुग्ण वाढत आहेत.
२१ कोटी लोक स्वतःच्याच घरात कैद…
कोरोना संसर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने चीन प्रशासनाने १ मे रोजी होणाऱ्या मजूर दिनाच्या सार्वजनिक कार्यक्रमांवरही निर्बंध घालून सर्व कार्यक्रम रद्द केले होते . चीनच्या मागील ७३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मे दिनाचे कार्यक्रम रद्द झाल्याची ही पहिलीच वेळ आहे.
सुमारे ७५ लाख सरकारी कर्मचारी मदत साहित्य वाटप आणि इतर कार्यांत…
चीनच्या अनेक शहरांत लॉकडाउनमुळे लोकांचे जीवनावश्यक वस्तु देखील वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांना या संकटाना सामोरे जावे लागत आहे.दरम्यान चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी सुमारे ७५ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मदत साहित्य वाटप आणि इतर कार्यांत लावले आहे. तरीसुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने आता कम्युनिस्ट पक्षाच्या जवळपास ५० लाख कार्यकर्त्यांना मदत कार्यासाठी उतरवले आहे.
लॉकडाऊनचा चीनच्या जीडीपीवर परिणाम…
तब्बल २६ शहरांत लॉकडाऊन असल्या कारणाने त्याचा थेट परिणाम चीनच्या २२ टक्के जीडीपीवर परिणाम होत आहे. अशा वेळी चीनच्या ११२६ लाख कोटींच्या एकूण जीडीपीपैकी २४७ लाख कोटींची अर्थव्यवस्था प्रभावित होत आहे.