जळगाव । राज्यात सध्या भोंग्यावरून राजकारण पेटलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसापासून मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका लावून धरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. अशातच राज ठाकरेंच्या टीकेला आता पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे.
”राज ठाकरे यांनी तीन वर्षात तीन भूमिका बदलल्या असून आता भाजपचा हवाला घेणे हेच त्यांना काम उरले आहे. आता त्यांना एजंट म्हणून काम करावं लागतय अशा शब्दात ना. पाटील यांनी टीका केली आहे.
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे होऊ घातलेल्या सभे बद्दल संपूर्ण राज्यभरात उत्सुकता निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्शवभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांना या सभेविषयी विचारलं असता त्यांनी म्हटल आहे की, “राज ठाकरे यांना सभा घेण्याची आवड आणि छंद आहे.
त्यामुळे ते नेहमी सभा घेत असतात. मात्र गुणपत्रिकेवर किती मार्क आहेत हे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत त्या गुणपत्रिकेला महत्त्व असते. त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी आजपर्यंत एका आमदाराशिवाय जास्त निवडून आणू शकलेले नाहीत.” राज ठाकरे यांनी तीन वर्षात तीन भूमिका बदलल्या. आता भाजपचा हवाला एजंट म्हणून काम करावं लागतय. असेही ते म्हणाले