मुंबई: भाजप-राष्ट्रवादीची युती होणार होती. पण शिवसेनेला तिसरा पक्ष नको होता त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो नाही, असं विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं असून यामुळे प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, यावरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एका मोठा गौप्यस्फोट केला.
2017मध्ये राष्ट्रवादीशी युतीबाबत चर्चा सुरू होती. पण त्यानंतर राष्ट्रवादीने अचानक चर्चेतून माघार घेतली. केवळ भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार असावं असं राष्ट्रवादीचं म्हणणं होतं. त्यांना शिवसेना युतीत नको होती, असा गौप्यस्फोटच दानवे यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तेव्हा, 25 ते 30 वर्ष आम्ही शिवसेनेसोबत आहोत आणि आम्ही त्यांना धोका देणे किंवा सोडणं आमच्या मतदाराला पण पसंत पडणार नाही, असं आमचं म्हणणं होतं. या एका मुद्द्यावर सरकार बनवण्याच्या मुद्द्यावर चर्चा फेल ठरली. शिवसेनेला सोबत घेण्यास काय हरकत आहे? आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करू असं आम्ही राष्ट्रवादीला सांगितलं. तेव्हा जे बैठकीत होते, त्यांनी सांगितले की आमची आणि शिवसेनेची विचारधारा एक नाही. त्यामुळे आमचं सरकार बनू शकत नाही, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.