जळगाव : एम.पी. लॉ काॅलेजमध्ये द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहन झामा पाटील (२४, मूळ रा. वडगाव, ता. रावेर, जि. जळगाव, ह. मु. समर्थनगर, अाैरंगाबाद) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून आत्महत्येपूर्वी रोहनने चार पानांची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीच्या आशयानुसार रोहनचा प्रेमभंग झाल्याचे समोर येत आहे.
आत्महत्यापूवी लिहिली चिट्टी
‘माझा तुझ्यावर खूप विश्वास होता, पण विश्वासघात झाला. काय कारण होतं ते कळलंच नाही. माझं काय चुकलं ते सांगायचं होतं. त्याच्यात काय होतं असं… शेवटी निर्णय तुझा आहे. पण मरण्याअगोदर एक सांगतो, आयुष्यात तुझं कधीच चांगलं होणार नाही. माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये,’ अशी चार पानी चिठ्ठी लिहून रोहन लिहिली.
रोहनचे आई-वडील शेतकरी असून, भाऊ नाशिक येथे नोकरी करतो. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.