नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे लोकांना नुकसानभरपाई मिळू लागली. अशा परिस्थितीत अनेकांनी रक्कम मिळविण्यासाठी खोटे दावे करण्यास सुरुवात केली. अशा प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्राची परवानगी मिळाली
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला कोरोनामुळे मृत्यूची भरपाई मिळण्यासाठी दाखल केल्या जाणाऱ्या खोट्या दाव्याच्या आरोपांची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. या अंतर्गत, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमध्ये दाखल केलेल्या दाव्यांपैकी 5% दाव्यांचे पुनरावलोकन केले जाईल.
60 दिवसात दावा
त्याचवेळी, सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नुकसानभरपाईचा दावा करण्यासाठी 28 मार्चपर्यंत 60 दिवसांची मुदत दिली आहे. भविष्यातील मृत्यूची भरपाई मिळण्यासाठी दावाही ९० दिवसांच्या आत करावा लागेल.
4 राज्यांमध्ये तपास केला जाईल
सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर, केंद्र सरकार 4 राज्यांमध्ये 5% नुकसानभरपाईच्या दाव्यांची पडताळणी करू शकते. या दाव्यांची संख्या आणि नोंदवलेल्या मृत्यूची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला कोरोनाच्या नुकसान भरपाईसाठी खोटे दावे दाखल करण्याच्या चौकशीची परवानगी दिली आहे.