जळगाव : एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गणेश पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहे.
याबाबत असे की, जामनेर तालुक्यातील पहूर येथे राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयी मुलीला गणेश शांताराम पवार याने पळून जाऊ, असे सांगून त्याच्या पांढऱ्या रंगाच्या इको गाडीत बसविले. त्यानंतर एका गावाजवळील रस्त्याजवळ गाडी थांबवून गाडीतच त्याने पीडितेवर अत्याचार केला, असे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे.
यासंदर्भात पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात गणेश पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करत आहेत.