बोदवड : मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून बोदवडमधील विवाहितेचा छळ करण्यात आला व त्यास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली होती. या प्रकरणी मयत विवाहितेच्या पतीसह चुलत सासू-सासर्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी बोदवड पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह दोघांना अटक केली आहे.
छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
बोदवड शहरातील गोरक्ष नगरात मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून होणार्या छळास कंटाळून भावना निलेश महाजन (27) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली होती. भावनाचे लग्न निलेश सुभाष महाजन (35) यांच्याशी सात वर्षांपूर्वी झाले मात्र मूलबाळ होत नाही या कारणावरून पती, चुलत सासरे व सासू यांनी भावनाचा मानसिक व शारीरीक छळ करून क्रूर वागणूक देऊन आत्महत्येला प्रवृत्त केले, अशी फिर्याद भूषण अशोक माळी, (रा.असोदा) यांनी दिल्यानंतर पती निलेश महाजन, चुलत सासरे प्रकाश दौलत महाजन व चुलत सासू मंगला प्रकाश महाजन (सर्व रा.गोरक्षनाथ नगर, बोदवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे पण वाचा :
अंदमानमध्ये आज चक्रीवादळ धडकणार? IMD कडून अलर्ट जारी
संतापजनक ! 4 वर्षाच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार, नराधमाचा शोध सुरु
घरगुती गॅस सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ, चेक करा आजचे रेट
NIA मध्ये विविध पदांची मोठी पदभरती, 12वी पास देखील अर्ज करू शकतात
याप्रकरणी पती नीलेश महाजन व चुलत सासरे प्रकाश महाजन यांना अटक करण्यात आली असून चुलत सासू मंगला महाजन यांना मंगळवारी अटक करण्यात येणार आहे. पोलिस उपनिरीक्षक शरद माळी तपास करीत आहेत.