नवी दिल्ली : देशात दीर्घकाळापासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. जळगावात पेट्रोलचा दर 112 रुपये प्रति लिटर आहे.
राज्यातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल परभणी जिल्ह्यात विकलं जात आहे. परभणीतील पेट्रोलचा दर 113.50 तर डिझेलचा दर 96.17 इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोल 110.64 रुपये तर डिझेल 93.43 रुपयांनी विकलं जात आहे. मुंबईतील पेट्रोलचा दर 110.82 रुपये तर डिझेलचा दर 95.00 रुपये इतका आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज (मंगळवार) म्हणजेच 22 मार्च 2022 रोजी पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लिटरवरून 96.21 पर्यंत वाढली आहे. तर डिझेल 86.67 रुपयांनी महाग होऊन आता 87.47 रुपयांवर पोहोचले आहे.
हे पण वाचा :
राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता
घरगुती गॅस सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ, चेक करा आजचे रेट
NIA मध्ये विविध पदांची मोठी पदभरती, 12वी पास देखील अर्ज करू शकतात
विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज जाहीर
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट तेलाची किंमत प्रतिबॅरल १०० डॉलरवर घसरली असताना राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. रशिया-युक्रेन तणावानंतर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 130 डॉलरच्या पुढे गेली होती, त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झाली नव्हती.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.