उस्मानाबाद : महाविकास आघाडी व एमआयएमच्या (mim) युतीच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार नितेश राणे यांची जीभ घसरली आहे. तुळजाभवानी देवीच्या मंदिरातच नितेश राणे यांनी राष्टवादीवर अश्लील टीका केली आहे.
आमदार नितेश राणे हे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब दर्शन घेवून देवीचा धार्मिक कुलाचार केला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना महाविकास आघाडीवर टीका कली.
‘लग्नाचा प्रस्ताव एमआएएमने दिला आहे, तो स्विकारावा का नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या घरात कोण कुणासोबत झोपतंय हा आमचा प्रश्न नसून भाजप स्वबळावर 2024 मध्ये सत्ता स्थापन करेल’ असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं.
तसंच, ‘उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याची धमक देवेंद्र फडणवीस यांच्यातच आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यावर आम्ही हे करून दाखवू, असंही नितेश राणे म्हणाले.