मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात उष्णेतेची लाट आलेली दिसून आली. मार्च महिन्यातच राज्यातील पारा ४० अंशावर गेल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे. अशातच हवामान खात्याने (IMD) राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अंदमान निकोबारमध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येईल. त्यामुळेच हवामान खात्याने (IMD) मुंबई पाऊस, पुणे, कोकणासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडू शकतो, असे आयएमडीने सांगितले आहे.
पुढील 12 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. मात्र, राज्यातील अनेक भागात तापमानात घट झाली आहे. तसेच आकाशात काळे ढग आले असून पुण्यात ढगाळवतावरण आहे, असे असूनही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (Marathwada) हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भातही (Vidarbha) उष्मा कायम राहण्याची शक्यता आहे.
तसेच, रविवारी भारतातील (India) अनेक राज्यांमध्ये पाऊस झाला आहे. यासोबतच IMD ने महाराष्ट्रातील विदर्भात सुद्धा पावसाचा इशाराही जारी केला होता. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही हवामानात बदल झाला आहे. मुंबईमध्ये देखील सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. तर सतत वाढत असलेल्या तापमानातही घट झाली आहे. मुंबईतही तापमान घसरल्याची स्थिती आहे.