भारतीय सैन्यात विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indianarmy.nic.in ला भेट द्यावी लागेल आणि अधिसूचना पाहावी लागेल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत म्हणजेच ११ एप्रिल २०२२ आहे.
एकूण १४ पदांमध्ये कुक – ९ पदे, शिंपी – १ पद, नाभिक – १ पद, रेंज चौकीदार -१ पद आणि सफाईवाला – २ पदांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता
कुक पदासाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असावेत. तसेच, भारतीय स्वयंपाकात प्राविण्य असणे आवश्यक आहे. याशिवाय शिंपी पदासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असावी आणि शासन मान्यताप्राप्त संस्थेचे या क्षेत्रातील ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.
भारतीय लष्कराने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय अनारक्षित श्रेणीसाठी १८ ते २५ वर्षे असावे. तसेच, OBC प्रवर्गासाठी १८ ते २८ वर्षे आणि SC/ST प्रवर्गासाठी १८ ते ३० वर्षे असावे.
हे देखील वाचा :
..अन् मगरींनी भरलेल्या तलावात त्याने घेतली उडी, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
खळबळजनक ! शारीरिक संबंधास नकार दिल्याने प्रियकराने केली प्रेयसीची हत्या
Alert ! ही’ पाच कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा, नाहीतर भरावा लागेल दंड
अर्ज करा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indianarmy.nic.in ला भेट द्यावी लागेल आणि अधिसूचना पाहावी लागेल. उमेदवारांनी भरलेला अर्ज अर्जाच्या शेवटच्या तारखेपूर्वी कमांडंट, ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर, जबलपूर (एमपी) पिन – ४८२००१ येथे पाठवणे आवश्यक आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी, उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत साइटला भेट देऊ शकतात.
अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा