नवी दिल्ली : अनेकदा असे व्हिडिओही पाहायला मिळतात, ज्यात एखादी व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून स्टंट करण्याचा प्रयत्न करते. हे व्हिडिओ पाहून सर्वसामान्य लोक थक्क होतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल आणि कोणीही हेच म्हणेल, की हा व्यक्ती खरंच ‘खतरों का खिलाड़ी’ आहे. पृथ्वीवर विविध प्रकारचे आणि धोकादायक प्राणी राहतात, त्यातीलच एक आहे मगर. तिचं खडबडीत आणि काटेरी शरीर पाहूनच अंगावर काटा येतो.
पाण्यात मगरीसोबत पंगा घेणं, म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. तरीही काही लोक या धोकादायक शिकाऱ्याच्या जवळ जातातच. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्यक्ती स्वतःच मगरींनी भरलेल्या तलावात जातो.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की तलावात अनेक भुकेल्या मगरी दिसत आहेत. अशा परिस्थितीत एक व्यक्ती न घाबरता त्या तलावात उडी मारतो आणि मगरी वेगाने या व्यक्तीच्या दिशेने येऊ लागतात. मात्र हा व्यक्ती मगरीला हाताने उचलून दुसऱ्या बाजूला फेकतो. त्याच्याकडे बघून तो मगरींबरोबर खेळायला गेला असावा असं वाटतं! हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक थक्क झाले असून कमेंट्समधून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.