नवी दिल्ली : सोने खरेदीचा प्लॅन बनवीत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोने पुन्हा एकदा स्वस्त झाले आहे. सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल चार हजारांची घसरण झाली आहे.
काय आहे प्रति तोळा?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) नुसार 24 कॅरेट सोन्याची किंमत 55,558 रुपये प्रति 10 ग्रामवरून घसरून 51,475 रुपये प्रति दाहा ग्रॅमवर आली आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 51,475 रुपयांवर बंद झाला होता.
रशिया आणि युक्रेन युध्दाचा परिणाम हा आतंरराष्ट्रीय बाजारपेठेवर झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सोने ५५ हजारावर गेले होते. त्यानंतर काही दिवसापासून पुन्हा घसरण होत आहे.
चालू आठवड्यात गुरुवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळाले.तज्ज्ञाच्या मते अमेरिकन रिझर्व्ह फेडने (US Fed Rate) व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेने आपले व्याज दर 0.25 टक्क्यांनी वाढवल्याने त्याचा फटका हा सोन्याच्या किमतीला बसला असून, सोने तब्बल चार हजारांनी स्वस्त झाले आहे.
प्रमुख शहरातील सोन्याचे दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,300 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 5,600 प्रति 10 ग्रॅम एवढा आहे. पुण्यात प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,400 एवढा आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51700 एवढा आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47380 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51680 रुपये इतका आहे. चांदीचा दर प्रति किलो 68 हजार रुपये इतका आहे. दरम्यान सोन्याची खरेदी करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी सोन्याचे दर हे त्याची शुद्धता आणि दागिन्यांच्या डिजाईनवरून थोड्या-फार फरकाने कमी जास्त होऊ शकते.