मंदसौर : होळीनिमित्त मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आत्याकडे आलेल्या चार वर्षाच्या चिमुलीवर आत्येभावाने बलात्कार केला. यानंतर नराधम आत्येभावाने चिमुकलीची हत्या केली. नात्याला काळीमा फासणारी ही घटना राज्यात वाऱ्यासारखी पसरली.होळीनिमित्त लेकीला बहिणीच्या घरी पाठवलं. पण त्या बापाला लेकीचा मृतदेह पाहावा लागला. याप्रकरणी पोलीस तपास करत आहे.
राजस्थानमधून चार वर्षांची चिमुकली होळीनिमित्त मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आत्याच्या घरी आली होती. त्यानंतर रात्री ही मुलगी अचानक बेपत्ता झाली. सणासाठी आलेली चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याने नातवाईकांनी आक्रोश केला. मुलीला परिसरात चहुकडे तपासल मात्र ती कुठेही सापडून आली नाही. चिमुकलीच्या आत्यासह तिच्या नातेवाईकांनी बराच वेळ चिमुकलीचा शोध घेतला असता एका ठिकाणी मुलीचा मृतदेह पडलेला आढळून आला. या संपूर्ण प्रकरणाची नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली.
या संपूर्ण प्रकरणाची नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरु केला आहे. मुलीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांची मुलगी होळीनिमित्त आत्याच्या घरी आली होती. त्यानंतर त्यांना फोन आला. यावेळी मुलीच्या वडिलांनी चिमुकलीची विचारपूस केली. यावर चिमुकलीच्या आत्याने मुलीची हत्या झाल्याचे सांगतिले. यामुळे मुलीच्या वडिलांनी तात्काळ राजस्थानमधून निघून मध्य प्रदेशातील मंदसौर गाठले. यावेळी सणासाठी आलेल्या त्यांच्या चिमुकलीचा मृतदेह त्यांना पहावा लागला.
आत्याचा मुलगा अटकेत
घटनेची संपूर्ण माहिती देताना यशोधर्मन नगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक लक्ष्मी सिसोदिया यांनी सांगितलं की, मुलीच्या मृतदेह सापडला आहे. शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असून याप्रकरणी तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी मुलीवर बलात्काराचा गुन्हा आहे आणि तिचा मृत्यू गळा दाबल्याने झालाय. यानंतर पोलिसांनी अधिक तपास करुन आत्याच्या मुलाला अटक केली आहे. आत्याच्या मुलानेच चिमुकलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिची गळा आवळून हत्या केली. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.