जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यामध्ये प्रथमच राजपूत समाजाच्या प्रीमियर लीग चे आयोजन येत्या २४ मार्च ते २७ मार्च पर्यंत सागर पार्क येथे करण्यात आलेले आहे. राजपूत समाजाच्या एकत्रीकरण्याच्या उद्देशाने ह्या लीग चे आयोजन करन्यात आले. कार्यक्राचे मुख्य प्रायोजक अखिल भारतीय क्षत्रिय महासभा १८९७ असून सह प्रायोजक श्री राजपूत करणी सेना आहे तसेच संयुक्त प्रायोजक शोभणारं ग्रुप हे असतील. तरी सर्व समाजाने या क्रिकेट लीगचा आनंद घ्यावा असे आव्हाण संघटने मार्फत करण्यात आलेले आहे.
या क्रिकेट लीग मध्ये एकूण १६ संघ संहभागी असून जळगाव जिल्हातील प्रत्येक तालुक्यातून खेळाळू आलेले आहेत. याव्यतिरिक्त या ठिकाणी विवाह इच्छुक उमेदवारांची नोंदणी तसेच बेरोजगार युवक यांच्या नोंदण्या सुद्धा होणार आहेत.