जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनंेतर्गत पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. अन्यथा योजनेच्या अकराव्या हप्त्यापासून वंचित रहावे लागेल.
सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय दिलेले आहेत. पीएम किसान संकेतस्थळावरील फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पीएम किसान अॅपव्दारे ओटीपीव्दारे लाभार्थ्यांना स्वत: ई-केवायसी मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्रावर ई-केवायसी प्रमाणिकरण बायोमेट्रिक पध्दतीने होईल. तेथे प्रती लाभार्थी १५ शुल्क लागेल.
हे सुद्धा वाचा :
नॅशनल हेल्थ मिशन बीड येथे मोठी पदभरती, आवश्यक पात्रता जाणून घ्या
Video ! सिगारेट पेटवत विषारी सापाजवळ पोहोचली मुलगी, मग पुढे जे झालं ते पाहून अंगावर येईल काटा
फरहान अख्तरच्या मेहुणीचे बिकिनी फोटो इंस्टाग्रामवर आगीसारखे व्हायरल, पहा फोटो
इकरा युनानी मेडिकल कॉलेज जळगाव येथे विविध रिक्त पदांची भरती
सर्व लाभार्थ्यांना एप्रिल-जुलै या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी ई-केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून ३१ अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.