पाचोरा, (प्रतिनिधी)- भाजपाने केलेल्या आंदोलनात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांचा एकेरी भाषेत उल्लेख करीत स्थानिक आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याबद्दल नको ते अपशब्द वापरुन स्वताची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी केविलवाणे प्रयत्न केला असल्याचा पलटवार पाचोरा शिवसेनेने केले आहे.मात्र कुणाची कुचेष्टा केल्याने आपली प्रतिष्ठा वाढत नसते या उक्तीप्रमाणे जर पाहिले तर त्यांनी केलेल्या शब्दप्रयोगामुळे त्यांच्यावरील संस्काराचे व नितिमत्तेचे त्यांनीच वाभाडे काढले असे दिसून येतं असल्याचे शिवसेनेने म्हटलं आहे.
सविस्तर असे की,पाचोरा येथे दिनांक १५ मार्च २०२२ मंगळवार रोजी महावितरण कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हितार्थ भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे महाएल्गार आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे मुख्य कारण म्हणजे महावितरण कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हितार्थ पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार व झोपेचे सोंग घेतलेल्या आमदारांना जागे करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले होते.
राजकारण आले म्हणजे आंदोलन, मोर्चे, निषेध हे होतच असतात परंतु राजकारण करतांना खालच्या पातळीवर जाऊन माननीय, सन्माननीय, वरीष्ठ, जेष्ठ व्यक्तींच्या बाबतीत बोलतांना माणूसपण, संस्कृती विसरुन एकेरी भाषेत उल्लेख करणे, अपशब्द वापरणे म्हणजे आकाशाकडे पाहून थुंकण्यासारखे आहे. व हीच चुक काल भाजपाने ढोल बजाव आंदोलनात करुन स्वताच्याच संस्कृतीचे ढोल बदडून घेतले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
कारण या ढोल बजाव आंदोलनाबाबत सांगायचे झाल्यास व कालचा प्रकार पाहिल्यावर व त्यांनी केलेली घोषणाबाजी व स्वताचे मत मांडतांना केलेला शब्दांचा वापर याचा सारासार विचार केला तर या मोर्च्यात शेतकऱ्यांबद्दल असलेला कळवळा कुठेही दिसून येत नव्हता मात्र राजकीय व्देष उमटत होता.
म्हणून काल दिनांक १६ मार्च २०२२ बुधवार रोजी शिवसेनेच्या वतीने भाजपच्या आंदोलनकर्त्यांकडून वापरण्यात आलेल्या अपशब्दांचा व गलिच्छ राजकीय खेळीचा निषेध करण्यासाठी, (तसेच महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ तात्काळ निर्णय घेऊन विज तोडणी थांबवली व शेतकऱ्यांची पिके वाचवली) या निर्णयाचे जल्लोषात स्वागत व करण्यासाठी या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.
या आंदोलनात राज्यात महावितरण कंपनीच्या धोरणामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने अधिवेशनात निर्णय करत आगामी तीन महिने शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज कापू नये असा निर्णय घेऊन समस्त शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे काम केल्याने आनंदित झालेल्या शेतकरी बांधवांना सोबत घेत शिवसेनेच्या वतीने पाचोऱ्यात बुधवारी दुपारी ४ वाजता महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मंगळवारी भाजपाच्या वतीने पाचोऱ्यात केलेल्या आंदोलनाला या वेळी जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.
भाजपाने पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विरुद्ध एकेरी व शिवराळ भाषा वापरल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी जशाच तसे उत्तर देत प्रतिहल्ला चढवत भाजपा पक्षांसह तालुकाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस यांचे विरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसैनिकांनी हातात भाजपाला जाब विचारणारे विविध पोस्टर्स झळकवले.
प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. यावेळी झालेल्या छोटेखानी सभेत मुकुंद बिल्डींकर, जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, युवा नेते सुमीत पाटील, जिल्हा उपप्रमुख ऍड अभय पाटील, यांनी भाषण करत भाजपाच्या शेतकऱ्यांसाठीच्या बेगडी (ढोंगु) पुळक्यावर टीकास्र सोडले. तसेच यावेळी चौकात पाचोरा मतदार संघाचा झालेला विकास बघू न शकणाऱ्या भाजपा साठी चष्मे ठेवण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपूत, संजय पाटील, रमेशचंद्रजी बाफना, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, माजी नगरसेवक डॉ. भरत पाटील, बाप्पू हटकर, दादा भाऊ चौधरी, प्रवीणजी ब्राम्हणे, रमेश पाटील, डॉ. शेखर पाटील, जितेंद्र पेंढारकर, सुधीर पाटील, संदीप राजे पाटील, सागर पाटील, वैभव राजपूत, भूषण पेंढारकर, सोनू परदेशी, राजेंद्र पाटील, शिवाजी ठाकूर, भागवत कोष्टी, गोरख महाजन, सागर पाटील, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मुकुंद बिल्दीकर, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, युवानेते सुमित किशोर पाटील, अॅड. अभय पाटील यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टिकास्त्र सोडले.