नागपूर : गोव्यात भाजपच्या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात आले आहेत. नागपुरात देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले आहे. या स्वागतानंतर देवेंद्र फडणवीसांनी गोवा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असा निर्धार केला.
हे देखील वाचा :
SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! हे काम ३१ मार्चपर्यंत करा, अन्यथा..
ईशा गुप्ताने ओलांडली बोल्डनेसची हद्द, फोटोनं इंटरनेटवर उडवली खळबळ
मंदानाने बाथरुममधील अंघोळ करतानाचा व्हिडिओ केला शेअर, आगीसारखा झाला व्हायरल
10 हजारांचा दंड टाळायचा असेल तर’हे’ काम त्वरित करा
महागाईचा आणखी एक झटका ! आता या गोष्टी महागल्या, वाचा नव्या किंमती*
राज्यात भ्रष्टाचारी सरकारविरोधात सामान्य माणूस भाजपच्या सोबत आहे. राज्यातील सरकार हे महाविकास आघाडी नाही, ही महावसुली आघाडी आहे. सरकारमधील दोन मंत्री जेलमध्ये आहेत. राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढाई शिगेला पोहचली आहे. प्रवीण दरेकरांना फसविण्याचा प्रयत्न झाला. तरीही तुमच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणं थांबणार नाही, असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. शेवटी फडणवीस यांनी गोवा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असा निर्धार केला. महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.