मुंबई : उष्णतेच्या बाबतीत हवामान विभागानं व्यक्त केलेला अंदाज खरा ठरताना दिसतोय. कारण गेल्या काही दिवसांत मुंबईसह कोकणातील अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट आली असून तापमान 40 अंशापार गेलं आहे. तसेच काल राज्यातील सार्वधिक ४२.९ अंश तापमानात जळगाव जिल्ह्यातील भुसावळसह अकोला येथे नोंदविला गेलं आहे. दरम्यान, हवामान खात्यानं आज विदर्भात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा दिला आहे.
उत्तर-मध्य महाराष्ट्रात यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदा पारा चाळिशी पार गेला अाहे. बुधवारी जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस नाेंदवले गेले.तर मुंबईतील काही ठिकाणांच्या स्टेशनवरील तापमान 40 अंश सेल्सिअसवर गेलं होतं. मुंबईमध्ये 1956 नंतर मार्चमध्ये प्रथमच पारा 41 अंशांवर गेला होता. दरम्यान, आज मुंबईत ग्रीन अलर्ट दिला आहे.
हे देखील वाचा :
SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! हे काम ३१ मार्चपर्यंत करा, अन्यथा..
ईशा गुप्ताने ओलांडली बोल्डनेसची हद्द, फोटोनं इंटरनेटवर उडवली खळबळ
मंदानाने बाथरुममधील अंघोळ करतानाचा व्हिडिओ केला शेअर, आगीसारखा झाला व्हायरल
10 हजारांचा दंड टाळायचा असेल तर’हे’ काम त्वरित करा
महागाईचा आणखी एक झटका ! आता या गोष्टी महागल्या, वाचा नव्या किंमती*
काय काळजी घ्याल?
उष्णतेची लाट आल्याने लहान मुलं, वृद्धांसह आधीच आजारी असलेल्यांनी सावध राहण्याची गरज आहे. यामुळे शरीरात पेटके येणे, थकवा येणे, उष्माघात यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे भरपूर पाणी प्या, जेणेकरुन शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राहिल.
तापमान अधिक वाढल्याने उन्हात बाहेर पडणं टाळा. घराबाहेर पडणं गरजेचं असल्यास छत्रीचा वापर करा. टोपी किंवा रुमालाने डोकं झाका. हलके आणि सुती कपडे परिधान करा.
हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज 500 मिली जास्त असते. त्यामुळे जरी तहान लागली नाही तरी जास्त प्रमाणात पाणी प्या.
चहा, कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंकऐवजी ओआरएस, लिंबू सरबत, ताक आदी पेय प्या, जेणेकरुन शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवता येऊ शकतं.