अयोध्या : रामाची नगरी असलेल्या अयोध्येत बुधवारी रात्री एक संतापजनक घटना समोर आलीय. भंडाऱ्यासाठी गेलेल्या 7 वर्षीय मुलीवर अज्ञात व्यक्तीनं बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकंच नव्हे तर नराधमानं तिच्यावर बलात्कार करुन तिला गंभीर अवस्थेत सोडून पळ काढला.
पीडित अल्पवयीन मुलीला उपचारासाठी श्री राम रुग्णालयात नेण्यात आलं. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला विभागीय रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर मुलीची प्रकृती आणखीन खालावल्यानं विभागीय रुग्णालयातून लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.
हे देखील वाचा :
SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! हे काम ३१ मार्चपर्यंत करा, अन्यथा..
शरद पवार, सुप्रिया सुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर, जाणून घ्या तारखा
मंदानाने बाथरुममधील अंघोळ करतानाचा व्हिडिओ केला शेअर, आगीसारखा झाला व्हायरल
10 हजारांचा दंड टाळायचा असेल तर’हे’ काम त्वरित करा
महागाईचा आणखी एक झटका ! आता या गोष्टी महागल्या, वाचा नव्या किंमती*
ऐन सणासुदीच्या काळात एका निष्पापावर बलात्कारासारख्या मोठ्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. बुधवारी रात्री उशिरा रुग्णालयात लोकप्रतिनिधी आणि अयोध्येतील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी जवळपास लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. मात्र अद्याप आरोपींचा पत्ता लागलेला नाही.