भारतीय लष्करातील शॉर्ट सर्व्हिस कमिशन NCC स्पेशल एंट्री स्कीमसाठी तपशीलवार अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियाही आजपासून सुरू झाली आहे. नोटीसनुसार, अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार 13 एप्रिल 2022 पर्यंत एनसीसी विशेष प्रवेश योजनेसाठी अर्ज करू शकतील. हा अभ्यासक्रम पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी आहे. भारतीय लष्कराचा 52 वा NCC अभ्यासक्रम ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू होणार आहे. एनसीसी स्पेशल एंट्री स्कीममध्ये निवड झाल्यानंतर कॅडेट्सच्या स्वरूपात प्रशिक्षण दिले जाईल. उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला सैन्यात अधिकारी पद मिळेल.
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू – 15 मार्च 2022
अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 एप्रिल 2022
अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता
NCC प्रमाणपत्र धारक – उमेदवारांनी किमान ५०% गुणांसह बॅचलर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. किमान दोन ते तीन वर्षे NCC च्या वरिष्ठ विभाग/विंगमध्ये सेवा केलेली असावी. तसेच, एनसीसीच्या सी प्रमाणपत्रात किमान बी ग्रेड असणे आवश्यक आहे.
वय श्रेणी
एनसीसी विशेष प्रवेश योजनेसाठी अर्जदाराचे वय १९ ते २५ वर्षे दरम्यान असावे.३
इतका मिळणार पगार
NCC पुरुष (NCC Men) – 56,100/- – 1,77,500/- (Level-10)
NCC महिला (NCC Women) – 56,100/- – 1,77,500/- (Level-10)
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.