जळगाव : तालुक्यातील भादली गावातील भरत भिकन पाटील (वय २३) या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. भरत याने कर्ज काढून नवीनच चारचाकी घेतली होती. त्याशिवाय विविध सहकारी सोसायटीचे त्याच्यावर कर्ज होते. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.
याबाबत असे की, भरत हा वडील भिकन दगा पाटील, आई वंदना, पत्नी व लहान भावासह वास्तव्याला होता. काही दिवसांपूर्वी त्याने कर्ज काढून चारचाकी घेतली होती. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. आई, वडील शेतीचे काम करायचे. स्वत:च्या मालकीची थोडीच शेती आहे. लहान भाऊ गाडी घेऊन मुंबई गेला होता तर भरत घरीच होता.
हे देखील वाचा :
सिद्धूचा राजीनामा, सोनिया गांधींना पत्र लिहून दिली ‘ही’ माहिती
मंदानाने बाथरुममधील अंघोळ करतानाचा व्हिडिओ केला शेअर, आगीसारखा झाला व्हायरल
10 हजारांचा दंड टाळायचा असेल तर’हे’ काम त्वरित करा
महागाईचा आणखी एक झटका ! आता या गोष्टी महागल्या, वाचा नव्या किंमती*
सोमवारी रात्री कुटुंबासोबत त्याने जेवण केले. पुढच्या खोलीत आई, वडील तर मागच्या खोलीत पती-पत्नी झोपले होते. पहाटे चार वाजता पत्नी झोपेतून उठली असता पतीने गळफास घेतल्याचे दिसले. हा प्रकार पाहून तिने हंबरडा फोडला. नातेवाइकांनी भरतला तशाच अवस्थेत खाली उतरवून जीएमसीत अाणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.