मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी माहिती दिली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 7231 पदांची भरती करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
ही भरती होताना कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. यामुळं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.
दरम्यान, राज्यात 5297 पदांची पोलीस भरती अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसात पोलीस भरतीची ती प्रक्रिया पूर्ण होईल. उमेदवारांना नेमणूक आदेश देण्यासंदर्भातील कार्यवाही सुरु आहे. तर, काही ठिकाणी मुलाखत घेण्याचं काम सुरु आहे. तर, येत्या काही दिवसात 2019 ची पोलीस भरती प्रक्रिया दिवसात पूर्ण करण्यात येईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. तर, 7231 पदांची भरती येत्या काही दिवसात सुरु करण्यात येईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
7231 पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु करणार
महाराष्ट्र पोलीस दलातील 7231 कॉन्स्टेबल पदांची भरती येत्या काळात सुरु करण्यात येईल. पोलीस भरतीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या पदाची भरती करताना कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ दिले जाणार नाहीत. ही भरती पारदर्शक पद्धतीनं केली जाईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.