मुंबई : राज्यात पेपरफुटीचे प्रकरण थांबण्याची चिन्हं दिसत नाही. अशातच आता, थेट बारावीच्या परीक्षेचा पेपर फुटला असल्याचे समोर आले आहे. शनिवारी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर झाला होता. मात्र, परीक्षेआधीच हा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर आला होता. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकाने बारावी केमिस्ट्रीचा पेपर आपल्या विद्यार्थ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
मुकेश यादव असं या खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. या खाजगी शिक्षकाने आपल्या वर्गात शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना व्हाट्स अॅपवर हा पेपर सुरू होण्याआधीच दिला असल्याची माहिती मिळाली आहे.
हे पण वाचा :
.. अन् ९ महिन्याच्या चिमुकलीसह आईने घेतला गळफास ! धुळ्यातील घटना
वारकऱ्यांच्या दिंडीचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
‘महाविकास आघाडीत सहभागी व्हायचं नव्हतं, मात्र…’, पटोलेंचं मोठं विधान
‘…तर जळगाव शहराचा सत्यानाश झाला नसता’ ; गुलाबरावांची गिरीश महाजनांवर टीका
सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली, जाणून घ्या आठवडाभरातील सराफा बाजाराची स्थिती
पोलिसांनी या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांची चौकशीदेखील केली आहे. पेपरफुटीसाठी मुकेश यादवसोबत आणखी कोणाच सहभाग आहे का, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का, याआधीदेखील पेपर फुटलेत का, आदी मुद्यांवरही पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. फुटलेला केमिस्ट्रीचा पेपर किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला याची माहितीदेखील पोलीस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार फक्त तीन विद्यार्थ्यांना हा पेपर मिळाला आहे. बारावी विज्ञान शाखेतील पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बारावीच्या इतर पेपरदेखील फुटले का, याची चौकशी ही करण्यात येत आहे. इतर पेपरही फुटले असल्यास त्याची व्याप्तीही मोठी असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात असून इतर बाबींच्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे.