नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून महागणाऱ्या सोने आणि चांदीच्या दराला ब्रेक लागला आहे. जागतिक बाजारातील नरमाईमुळे दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीचं दरात घसरण झाली आहे. आज शुक्रवारी भारतीय बाजारातही सोने-चांदीच्या किमती घसरल्या. सोन्याचा वायदा भाव 53 हजार रुपयांच्या खाली आला.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 9.53 वाजता सोन्याचा वायदा 338 रुपयांनी घसरून 52,901 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा वायदाही 70 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. MCX वर, चांदीचा दर 441 रुपयांनी कमी झाला आणि तो प्रति किलो 70,030 रुपये विकला गेला.
जागतिक बाजारातही सोन्या-चांदीचे दर खाली आले आहेत. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत $8.50 ने घसरून $1,991.90 प्रति औंस झाली. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत देखील $ 0.12 ने घसरली आहे. सकाळच्या ट्रेडिंगमध्ये चांदीचा दर 26.12 डॉलर प्रति औंस होता.