मुंबई : चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर सर्वत्र भाजपकडून जल्लोष साजरा केला जात आहे. यावेळी गोव्यातील विजयात मोलाचा वाटा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईत भाजपच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं. मुंबईतील भाजपच्या कार्यालयात नेते, पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवले. नेत्यांनी यावेळी नाचून या विजयाचा जल्लोष साजरा केला. दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या (bmc) निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. तसेच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आदेश फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिले.
विजयाने अधिक मेहनत करायची आहे. अभी तो असली लढाई मुंबई में होगी. आम्हाला मुंबईला कोणत्याही पक्षापासून मुक्त करायचे नाही. आम्हाला मुंबईला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत. जोपर्यंत भ्रष्टाचाराच्या विळख्यातून या मुंबईला बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही.
हे पण वाचा :
Jio च्या ‘या’ भन्नाट प्लानने Airtel-Vi ची उडाली झोप! दररोज 2GB डेटासह मिळताय या सुविधा
सनी लिओन झाली रक्तबंबाळ, ऑपरेशन टेबलवर पडलेला फोटो झाला व्हायरल
कर्मचारी, पेन्शनधारकांना मोदी सरकार देणार होळीची भेट? जाणून घ्या सरकारची काय योजना आहे
म्हणून हा विजय आज साजरा करा. उद्यापासून कामाला लागा. पुन्हा एकदा मुंबईत प्रचंड विजय आणि भाजपचं महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं सरकार बनविण्यासाठी सज्ज व्हा, असे आदेशच देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले.तसेच मोदी है तो मुमकीन है, असं सूचक विधानही त्यांनी केलं.