मुंबई : पाच राज्यातील निवडणुकीचा निकालात भाजपला उत्तर प्रदेश आणि गोवामध्ये मोठ्या संख्येने यश मिळाले आहे. दरम्यान, गोवा निकालानंतर शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “भाजपने वापरलेल्या नोटांमुळे आम्हाला ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाली असे संजय राऊत म्हणाले.
पुढे संजय राऊत म्हणाले, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राजकारणात ज्यांचा विजय होतो त्यांचं अभिनंदन करण्याची परंपरा आपल्या देशात आहे आणि त्यामुळे ज्या-ज्या राज्यात ज्या-ज्या पक्षाचा विजय झाला आहे त्यांचं मी पक्षातर्फे अभिनंदन करतो. पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. गोवा आणि उत्तराखंडमध्ये विजय मिळण्याची अपेक्षा होती पण पराभव झाला. उत्तरप्रदेशात अखिलेश यादव यांच्या सपापेक्षा अधिक चांगलं प्रदर्शन काँग्रेस करेल अशी अपेक्षा होती पण अपेक्षाहून कमी प्रदर्शन झालं.
आम्हाला नोटांपेक्षा कमी मतं मिळाली कारण आमच्याकडे नोटा कमी होत्या. तरी उत्तरप्रदेश आणि गोव्यात आम्ही आमच्या पद्धतीने लढलो. ही लढाई सुरू राहील. कोणत्याही निवडणुकीत विजय आणि पराजय हा अंतिम नसतो. ती सुरुवात असते. उत्तरप्रदेशात प्रियंका गांधी यांना चांगला प्रतिसाद मिळत होता पण त्यांना यश मिळाले याचा अर्थ लढाई संपली असा होत नाही. शिवसेनेच्या बाबतीत आम्ही जिथे-जिथे निवडणूक लढलो ती आमची सुरुवात आहे. भविष्यात आम्ही काम करत राहू.