मुंबई : सुरक्षीत आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय म्हणून भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) सर्वसामान्यांची पसंती असते. कमी हफ्त्यांत अधिक परतावा देणाऱ्या योजना म्हणून एलआयसीच्या पॉलिसी ओळखल्या जातात. अशात जर तुम्ही एलआयसी (LIC) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, आणि तुमच्याकडे जास्त बजेट नसेल, तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
ही योजना तुम्हाला फक्त २८ रुपयांच्या बचतीवर २ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देत आहे. ही योजना एलआयसीची मायक्रो बचत विमा पॉलिसी म्हणून ओळखली जाते. जी सुरक्षा आणि बचतीसाठी उत्तम योजना असू शकते. ही योजना गुंतवणुकदाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला संरक्षण पुरवते. तसेच परिपक्वता झाल्यावर एकरकमी रक्कमही दिली जाते.
सूक्ष्म बचत विमा योजना
१८ ते ५५ वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकते. यासाठी कोणतेही वैद्यकीय अहवाल मागवले जात नाहीत. याशिवाय, जर एखाद्या व्यक्तीने ३ वर्षांसाठी प्रीमियम भरला, तर त्याला ६ महिने प्रीमियम न भरण्याची सूट दिली जाते. त्याच वेळी पाच वर्षांसाठी प्रीमियम भरल्यावर २ वर्षांचे ऑटो कव्हर उपलब्ध आहे. या विमा योजनेत व्यक्तीला ५० हजार ते २ लाखांपर्यंत विमा मिळतो.
हे देखील वाचा :
सर्वसामान्यांना दिलासा, दागिन्यांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू झाल्या स्वस्त, या वस्तू महागल्या
कार चालकांसाठी खुशखबर : ‘या’ वाहनांमध्ये CNG आणि LPG किट बसवण्यास मान्यता, जाणून घ्या
पशुपालन निगम लि.मार्फत 7875 पदांची मेगा भरती, 10वी ते पदवी उत्तीर्णांना संधी
Budget 2022 : ३ वर्षांत ४०० नवीन गाड्या सुरू होणार ; अर्थमंत्री
मोठी बातमी : राज्यात आजपासून नवी नियमावली लागू, काय आहे नियम जाणून घ्या
एलआयसी मायक्रो बचत विमा पॉलिसीमध्ये प्रीमियम त्रैमासिक, मासिक, वार्षिक किंवा ६ महिन्यांच्या आधारावर भरला जाऊ शकतो. या पॉलिसी अंतर्गत अपघाती विमा देखील दिला जाऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला वेगळा प्रीमियम भरावा लागेल. या योजनेअंतर्गत, जर एखादी व्यक्ती १८ वर्षांची असेल, तर त्याला १५ वर्षांच्या योजनेसाठी प्रति हजार ५१.५ रुपये प्रीमियम भरावा लागेल. दुसरीकडे, २५ वर्षांच्या व्यक्तीने १५ वर्षांसाठी योजना घेतल्यास ५१.६० रुपये प्रीमियम आणि ३५ वर्षांच्या व्यक्तीला प्रति हजार ५२.२० रुपये द्यावे लागतील.
किती दिले जाते कर्ज?
या योजनेंतर्गत कर्जाचीही तरतूद आहे. जर ३५ वर्षांच्या व्यक्तीने १ लाख रुपयांच्या विमा रकमेसह १५ वर्षांची पॉलिसी घेतली असेल, तर त्या व्यक्तीचा वार्षिक प्रीमियम ५११६ रुपये असेल. ज्यावर ७० टक्के रकमेपर्यंत कर्ज दिले जाईल, तर पेड-अप पॉलिसीमध्ये ६० टक्के रकमेचे कर्ज दिले जाते. जर ही पॉलिसी आवडली नाही, तर ती १५ दिवसांच्या आत सरेंडर केली जाऊ शकते.