नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी अर्थमंत्री यांनी सांगितले कि पुढील तीन वर्षांत 400 नवीन वंदे भारत गाड्या सुरू केल्या जातील.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, लहान शेतकरी आणि लघु आणि मध्यम उद्योगांसाठी रेल्वे नवीन उत्पादने आणि कार्यक्षम लॉजिस्टिक सेवा विकसित करेल. ज्याद्वारे स्थानिक उत्पादनांची पुरवठा साखळी वाढवण्यासाठी ‘एक स्टेशन, एक उत्पादन’ योजना सुरू केली जाईल. त्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळेल. भारतीय रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी 100 गतिशक्ती कार्गोचीही योजना आहे.
अर्थमंत्री म्हणाले की, देशात मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसाठी पीएम गति शक्ती-राष्ट्रीय मास्टर प्लॅन सुरू करण्यात आला आहे. PM गतिशक्ती मास्टरप्लॅनमध्ये आर्थिक परिवर्तन, अखंड मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक कार्यक्षमतेसाठी 7 इंजिनांचा समावेश असेल.
हे देखील वाचा :
मोठी बातमी : राज्यात आजपासून नवी नियमावली लागू, काय आहे नियम जाणून घ्या
रिचार्ज करण्याआधी जाणून घ्या Jio च्या ‘या’ प्लॅनबद्दल, मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांच्या घराला विद्यार्थ्यांचा घेराव, पोलिसांकडून लाठीमार
संरक्षण मंत्रालयात 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी..
धक्कादायक ! मुकबधीर अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती
भारतीय रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी 100 गतिशक्ती कार्गोचीही योजना आहे. नवीन वंदे भारत ट्रेन्स आणि नवीन व्हिस्टाडोम कोच भारतीय रेल्वेच्या आभासात भर घालत आहेत. गेल्या 7 वर्षात 24000 किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे.
2022-23 दरम्यान राष्ट्रीय महामार्गाची लांबी 25000 किमीपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले. महामार्ग विस्तारीकरणासाठी 20 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत