सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. Ministry of Defence Transit Camp कडून विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीचे रिक्रुटमेंट नोटिफिकेशन 29 जानेवारीच्या Employment Newspaper मध्ये जारी करण्यात आले आहे. दरम्यान नोटीफिकेशन जारी झाल्यापासून पुढील 21 दिवस अर्ज करण्याची मुदत असणार आहे. दरम्यान यामध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार असल्याने अनेकांसाठी संधी आहे.
या नोकरभरती मध्ये 41 जागांवर भरती होणार आहे. त्यामध्ये सफाईवाला – 10 जागा, वॉशरमॅन -3, मेस वेटर 6, कूक 16, हाऊस कीपर -2, बार्बर 2 आणि मसालची 2 अशा जागा आहेत.
हे देखील वाचा :
कोकण रेल्वेत परीक्षेशिवाय नोकरीची संधी..कसा करावा अर्ज? जाणून घ्या
राज्यातील या जिल्ह्यांना कडाक्याच्या थंडीचा इशारा
किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, पाचोऱ्यातील धक्कादायक घटना
CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 12वी उत्तीर्णांसाठी बंपर रिक्त जागा
यासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी पास आवश्यक आहे. तर वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष आहे. इथे पहा नोटिफिकेशन!
नोकरीमध्ये भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि प्रात्यक्षिक चाचणीच्या आधारे केली जाणार आहे. या नोकरभरतीमध्ये पात्र उमेदवारांना विहित नमुन्यातील अर्जानुसार आणि आवश्यक कागदपत्रासोबत अर्ज करू शकतात.
वेतन: 5200-20200
जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लीक करा