जयपूर : मॉडेल तरुणीने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जोधपूर शहरात उघडकीस आली आहे. तरुणीचं नाव गुनगुन उपाध्याय असल्याची माहिती आहे. गुनगुन ही नवोदित मॉडेल असल्याचं समोर आलं असून तिने टोकाचं पाऊल उचलण्याआधी तिने फक्त माझा चेहरा पहा, असं वडिलांना फोन करुन सांगितलं होतं. मात्र तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
जोधपूर शहरातील रातानाडा भागात रविवारी ही घटना घडली. गुनगुन ही थान भागात राहणारे व्यापारी गणेश उपाध्याय यांची मुलगी आहे. गुनगुन उपाध्याय मॉडेलिंग करते. ती शनिवारी उदयपूरहून जोधपूरला आली होती. जोधपूरला आल्यानंतर तिने वडिलांना फोन करुन आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. फक्त माझा चेहरा पहा, असं तिने वडिलांना सांगितलं. त्यानंतर वडील गणेश उपाध्याय यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा :
कोकण रेल्वेत परीक्षेशिवाय नोकरीची संधी..कसा करावा अर्ज? जाणून घ्या
राज्यातील या जिल्ह्यांना कडाक्याच्या थंडीचा इशारा
किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, पाचोऱ्यातील धक्कादायक घटना
CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 12वी उत्तीर्णांसाठी बंपर रिक्त जागा
रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, गुनगुनच्या छातीसोबतच तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. सध्या तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मात्र तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला याची माहिती समोर आलेली नाही. गुनगुन उंचावरुन खाली पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. गुनगुनचे वडील जोधपूरमधील बाजारात व्यापारी आहेत. गुनगुन अद्याप काहीही सांगण्याच्या स्थितीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शुद्धीवर आल्यानंतरच तिने टोकाचं पाऊल का उचललं, याची कारणे स्पष्ट होतील.