पाचोरा,(किशोर रायसाकडा)- पाचोरा तालुक्यातील पोलीस शिपाई राहुल बेहरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीतून खाकीतील माणुसकीचे दर्शन झाले आहे, शहरातील ग्रामीण रुग्णालयात एक बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाल्या नंतर पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई राहुल बेहरे यांनी तात्काळ सर्वस्तरातून चौकशी सुरु ओळख पाठविण्यासाठी प्रयत्न केले.
पोलीस शिपाई राहुल बेहरे यांनी सहकारी पो.नरेंद्र नरवाडे व शिंदे सह पाचोरा ग्रामीण रुग्णालय गाठत मयत महिले विषयी माहिती घेतली,ओळख पटण्यासाठी तालुक्यातील सर्वत्र प्रयत्न केले उशिरा पर्यंत कुठल्याही निरोप न मिळाल्याने पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई राहुल बेहरे यांनी या बेवारस महिलेचा अंत्यविधी स्वखर्चाने करण्याचं ठरवलं
दरम्यान तालुक्यातील कुऱ्हाड येथून पोलीस शिपाई राहुल बेहरे यांना फोन आला व माहिती दिली कि, पाचोरा येथील रुग्णालयात आढळून आलेली बेवारस मयत महिला सुशाबाई त्र्यंबक देशमुख (वय ५२) आहेत त्या आमच्या मावशी असल्याचं कळविण्यात आलं.
पोलीस शिपाई राहुल बेहरे यांनी केलेल्या तत्पर कामगिरीमुळे आणि माणुसकी म्हणून बेवारस महिलेची अंत्यसंस्काराची दाखवलेली तयारी यातून खाकीतील माणुसकीचे दर्शन झालं आहे.