सोनं, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून आज सोनं, चांदीचे भाव उतरले असल्याने खरेदीदारांसाठी एक चांगली बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीचे दर घसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज महिन्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये रविवार ३० जानेवारी रोजी १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४५,००० रुपये आहे.चांदी ६१,१०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती वेगवेगळ्या ठिकाणी बदलतात याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.
आजचा भाव जाणून घ्या…
मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,००० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,००० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात (Pune) प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,०४० आहे तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,१३० रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,००० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,००० रुपये आहे. चांदीचा प्रती १० ग्रॅमचा दर ६११ रुपये आहे. या किमती स्थानिक किमतींशी जुळत नाहीत कारण यामध्ये GST, TCS आणि इतर कर समाविष्ट नाहीत. देशभरातील विविध शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या या किमती आहेत.