भोपाळ | लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने भोपाळ मधील एका कार्यक्रमा दरम्यान, ब्रा साईज आणि देव याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. माझ्या ब्रा चे माप देव घेत आहे असे विधान तिने केले. तिच्या या विधानानंतर सर्वत्र तिच्यावर टिकेचा भडीमार सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
श्वेता तिवारी तिच्या आगामी वेब सीरिजच्या घोषणेसाठी भोपाळमध्ये गेली होती. तिथे ती वेब सीरिजच्या संपूर्ण टीमसोबत प्रेम कॉन्फरन्समध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी श्वेता तिवारी हिने वादग्रस्त वक्तव्य करताना म्हंटल की, ‘माझ्या ब्रा चं माप देव घेत आहे’
Actress Shweta Tiwari made a controversial statement on God.. It happens in the press conference of #ShowStopper Webseries..#ShwetaTiwari @rohitroy500@DiganganaS #ControversialStatement #Trending #TrendingNow #ottplatform pic.twitter.com/EqmsibDoy4
— Deep Singh (@Deepsingh_page3) January 26, 2022
श्वेता तिवारीच्या वक्तव्याचा विरोध करत मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे, ‘श्वेता तिवारीने आतंरवस्त्राबाबत केलेले विधान अतिशय निंदनीय असून तमाम हिंदू संघटनेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी श्वेता तिवारीची पुढील 24 तासात चौकशी करण्याचे निर्देश भोपाळ पोलीस कमिशनरना देण्यात आले असून लवकरात लवकर या चौकशीचे रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर या प्रकरणावर योग्य निर्णय घेण्यास येईल’, असे ते म्हणाले.