जळगाव : वाढदिवसाच्या पार्टीत तलवार नाचवल्याप्रकरणी व तलवारीनं केक कापल्याप्रकरणी जळगाव पोलिसांनी ‘बर्थ डे बॉय’ला अटक केली. आपल्या बर्थडेच्या दिवशीच त्याला तुरुंगात रात्र काढावी लागलीय. मित्रांच्या मदतनीने भाई का बड्डे या गाण्यावर हा तरुण हातात तलवार नाचवत होता. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पोलिसांनी (Police) शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तलवार हातात घेऊन बर्थडे साजरा करणे या तरुणाला चांगलेच महागात पडले आह.
24 वर्षीय पंकज चौधरी आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत मित्राच्या खांद्यावर बसून ‘भाई का बड्डे’ गाण्यावर नाचत होता. त्याच्या हातात तलवार होती. तसेच मित्रांच्या गराड्यामध्ये तो तलावरीने केक कापत होता. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. मोठ्या थाटात साजऱ्या केलेल्या या तरुणाचा व्हिडीओ नंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा प्रकार नंतर चर्चेचा विषय ठरल्यानंतर पोलिसांनी ‘बर्थ डे बॉय’चा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पंकज भानुदास चौधरी असे अटक केलेल्या ‘बर्थ डे बॉय’चे पूर्ण नाव आहे. जोशात असलेल्या या बड्डेबॉयला वाढदिवसाची रात्र पोलीस ठाण्यात काढावी लागली.
हे सुद्धा वाचा :
खळबळजनक ! नाशिक पालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत
SBI, PNB, BOB च्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, 1 फेब्रुवारीपासून हे नियम बदलणार
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मोठी भरती ; त्वरित करा अर्ज
रिपब्लिक डे सेल 2022: सॅमसंगचा ‘हा’ स्मार्टफोन फक्त 500 रुपयांत खरेदी करा, आज शेवटचा दिवस
झणझणीत तडका ; पुष्पा चित्रपटाचा मराठी ट्रेलर पाहिला का ?