चोपडा : चोपडा तालुक्यात एका धक्कादायक घटना समोर आलीय. मेहुण्यासह इतर तीन जणांनी अत्याचार करून गर्भवती केलेल्या अपंग महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. याबाबत अडावद पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटना?
चोपडा तालुक्यातील एका गावात ३७ वर्षीय महिला आपल्या भावासह वास्तव्याला आहे. महिला ही अपंग असल्याने ही भावाकडे राहते. दरम्यान तिचे मेहुण्यासह इतर तिन जणांनी या तिन भावांनी अपंगपणाचा फायदा घेत पीडीत महिलेवर वारंवार अत्याचार केला.
या अत्याचारातून महिला ६ महिन्याची गर्भवती राहिली. हा त्रास सहन न झाल्याने पीडीत महिलेने २४ जानेवारी रोजी सकाळी आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे.
याप्रकरणी पीडीत मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किरण दांडगे करीत आहे.