जळगाव, दि. 24 (प्रतिनिधी) :- भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, 26 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस कवायत मैदानावर राज्याचे पाणीपुरवठ व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण व संचलन समारंभ होणार आहे.
. या कार्यक्रमास स्थानिक लोक प्रतिनिधी, स्वातंत्रय सैनिक, शहिद जवानांच्या पत्नीना व आई-वडील , कोरोनायोध्दा जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक, यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही नागरिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जळगाव यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील उदभवलेल्या कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक लक्षात घेता शासनाच्या महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांच्या दि. 8 जानेवारी, 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय सभेकरीता निर्धारित केलेल्या संख्येनुसार निमंत्रितांची उपस्थिती ठेवण्यात यावी. मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी दिनांक 26 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 8.30 ते 10 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखादया कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळा 8.30 च्या पूर्वी किंवा 10.00 च्या नंतर करावा.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वासाठी मास्क वापरणे व सामाजिक अंतर (Social Distancing) पाळणे बंधनकारक आहे. तसेच सदर ठिकाणी कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. नागरिकांनी हा सोहळा घरबसल्या पाहता यावा. यासाठी सदर कार्यक्रमाचे https;//www.facebook.com/jalgaonDM या लिंकवर Facebook live प्रेक्षपण करणेत येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.