जगभरात कोरोना वाढत असतांना कोरोनावर काहीप्रमाणात रोख आणण्यासाठी एकमेव पर्याय म्हणून लसीकरण जगासमोर आहे.कोरोना लस (Corona Vaccine) हा एकमेव उपाय म्हणून सर्व जगाने स्वीकारले आहे. आपल्याला या महामारीपासून वाचवण्यासाठी सध्यातरी लसीकरणचं एक प्रभावी मार्ग आहे.
दरम्यान कोरोना लस टोचून घेतल्या नंतर जगभरातील लोकांना शरीरात खूप विचित्र बदल जाणवल्याचे पाहायला मिळाले आहे. तर नुकताच एका महिलेने यासंदर्भात धक्कादायक दावा केला असून त्या महिलेचं म्हणणं आहे की, कोरोनाची लस टोचून घेतल्यानंतर तिच्या स्तनाचा आकार वाढला आहे.
‘द सन वेबसाइट’ च्या वृत्तानुसार, टिकटॉक यूजर एले मार्शलने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडीओ मध्ये तिने एक धक्कादायक दावा केला आहे. महिलेने व्हिडिओमध्ये सांगितले की, बऱ्याच काळापासून तिच्या ब्राचा आकार ‘ए कप’ होता म्हणजेच तिच्या स्तनाचा आकार लहान होता.मात्र जेव्हा तिने ‘फायझर लस’ टोचून घेतली तेव्हापासून तिच्या स्तनाचा आकार वाढला आहे.
व्हिडिओमध्ये महिलेने सांगितले की, तिला आता फक्त ‘सी कप’ म्हणजेच 2 साइजची मोठी ब्रा मिळते. ए कप ते सी कप पर्यंत स्तनाचा आकार वाढल्यामुळे महिला खूप चिंतेत आहे आणि तिला भीती वाटत की या लसीचा तिच्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. लसीनंतर स्तनांच्या आकारात बदल झाल्याचा दावा करणारी ‘ एली’ पहिली महिला नाही. तिच्या व्हिडिओवर अनेक महिलांनी कमेंट करून आपले अनुभव शेअर केले आहेत. कोविड लसीनंतर अनेक महिलांनी असाही दावा केला आहे की त्यांच्या मासिक पाळीतही बदल झाला आहे.
यावेळी डॉ. साराह जार्विस यांनी द सनशी बोलताना सांगितले आहे की, स्तनाचा आकार आणि मासिक पाळीत होणारा बदल प्लेसबो इफेक्टमुळे होतो. प्लेसबो इफेक्टचा अर्थ असा आहे की, जे लोक समोर पाहतात तेच स्वतःला अनुभवतात. डॉक्टरांनी सांगितले की, महिलांना मासिक पाळी येणं खूप सामान्य आहे आणि कोरोनापूर्वीही हे खूप सामान्य होतं. यासोबतच स्तनाचा आकार वाढणे हे लठ्ठपणा आणि खाण्याच्या सवयींवरही अवलंबून असते. ते म्हणाले की, वैज्ञानिकदृष्ट्या लस आणि स्तनांच्या आकारात होणारा बदल यांचा थेट संबंध नाही.