जळगाव, (प्रतिनिधी)- खासदार इम्तियाज जलील यांनी हिंदुसूर्य, महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारका बाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा श्री राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांनी जाहीर निषेध केला आहे.
ज्यांचे मुळे आज आमच्या देव्हाऱ्यात देव आहेत व दिवे आहेत असे हिंदुस्थान चे गौरव शाली ,भारत मातेचे महान सुपुत्र, अपराजित योध्दा ,हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या संभाजीनगर येथे होऊ घातलेल्या स्मारकाच्या कार्याला विरोध करून तिथे सैनिकी शाळा सुरू करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी करून आग ओकली आहे.
संपूर्ण हिंदू समाज व महाराणा प्रताप यांचेवर प्रेम करणाऱ्या समाज बांधव यांचा एक प्रकारे अपमान आहे. प्रस्तावित जागेत पुतळा बांधा व आपली मानसिकता असेल तर महाराणा प्रताप सिंह यांचे नावाने ग्रामीण भागा साठी सैनिकी शाळा पण काढा असे केल्यास आपले स्वागतच करू पण प्रथम ठरलेल्या जागी सिडको कॅनॉट परिसरात ‘महाराणा प्रतापसिंह’* यांचा पुतळाच उभा राहील याची जाणीव व भान आपण ठेवावे ,कारण हा एकट्या राजपूत समाजाचा प्रश्न नसून अखंड हिंदुस्थान मधील हिंदू बांधवांचा आहे.आपण भावना भडकवण्याचे काम करू नका व आम्हाला मोघल शाही शिकवू नका असं प्रविणसिंग पाटील यांनी म्हटलं आहे.