मुंबई : राज्यात अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. अशातच चार युवकांनी कामाहून परतणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना मुंबईतील गोवंडी येथील शिवाजीनगरमध्ये घडला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन जणांना अटकसुद्धा केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित वीस वर्षीय युवती एका हॉलमध्ये केटरिंगचे काम करते. सकाळी काम आटोपून युवती आपल्या घरी जात होती. यावेळी ओळखीच्या एका युवकाने तिला इतक्या उशिरा कुठे गेली होती असं विचारलं आणि तुझ्याशी काही बोलायचे असं म्हणून एका निर्मणुष्य झोपडीत नेले. त्याच वेळी त्याचे 3 साथीदारही त्या ठिकाणी आले. या तिघांनी नंतर आळीपाळीने युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेले. आरोपी गेल्यानंतर या युवतीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून आपबीती सांगितली.
ही माहिती समजताच पोलीस दलातील निर्भया पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच पीडितेला पोलीस ठाण्यात आणून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या संदर्भात पोलिसांनी 10 पथकं तयार करून आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत यातील दोन आरोपी उत्तर प्रदेश येथील वस्ती जिल्ह्यात आपल्या गावी निघून जाण्याच्या तयारीत होते. पण पोलिसांनी या दोन्ही आरोपीना डोंगरी येथून अटक केलं. तर बाकीच्या दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे अल्पवयीन आहेत. तर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी दिली.