पणजी । गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या या यादीत पणजीतून उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्याऐवजी त्यांना बिचोलीतून निवडणूक लढवण्याचा पर्याय देण्यात आला होता.
दरम्यान, भाजपने तिकीट नाकारल्यानंतर मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा करत भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासंदभार्त त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे याना पत्र पाठवलं आहे
हे सुद्धा वाचा…
भुसावळ येथे मध्य रेल्वेत भरती ; २४२२ पदे ; १० वी पास ; आजच करा अर्ज
8 वी ते ग्रॅज्युएशन पाससाठी बंपर नोकऱ्या, लवकर अर्ज करा, शेवटची तारीख जवळच
मध्य रेल्वेत 2422 जागांसाठी बंपर भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी
परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याचा गोल्डन चांन्स, या विभागात भरती
उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपला रामराम ठोकला आहे. भाजप सदस्यत्वाचा माझा राजीनामा स्वीकारावा,आत्तापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आभारी, अशा आशयाचे पत्र उत्पल पर्रिकर यांनी नारायण राणे यांच्याकडे सोपवले आहे.