जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या चेअरमन मंदाकिनी एकनाथराव खडसे ह्या दि. १३ जुलै २०२१ पासून रजेवर होत्या. त्यांनी १८ जानेवारी रोजी पुन्हा पदभार स्वीकारला आहे.
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या चेअरमन मंदाकिनी एकनाथराव खडसे ह्या दि. १३ जुलै २०२१ पासून दिनांक १७ जानेवारी २०२२ पर्यंत दीर्घ मुदतीच्या रजेवर होत्या. त्यांनी दि. १८ जानेवारी रोजी संघाच्या चेअरमनपदाचा पदभार स्वीकारला असून, कामकाज पाहण्यास सुरुवात केली आहे.