हिंगोली : राज्यात अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नाहीय. अशातच नात्याला काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आलीय. हिंगोली जिल्ह्यातील सवड येथील एका तरुणाने आपल्या पत्नीवर मित्राला बलात्कार करायला लावला. यावेळी विकृत पती घराबाहेर उभा राहून पहारा देत होता. या प्रकरणी पीडित महिलेनं हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या मित्राविरोधात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला घरी एकटी असल्याचं पाहून आरोपी पती मित्र माधव जोगदंड याला घरी घेऊन आला होता. घटनेच्या दिवशी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास पीडित महिला घरी एकटीच होती. यावेळी त्याने आपल्या मित्राला घरात पाठवून पत्नीवर बलात्कार घडवून आणला आहे. यावेळी आरोपी पती घराबाहेर थांबून मित्राला घरात पाठवून स्वत:च्या पत्नीवर बलात्कार घडवून आणला आहे. यावेळी विकृत पती घराबाहेर उभा राहून पहारा देत होता.
हे सुद्धा वाचा…
खळबळजनक ! सेल्फी काढत नवविवाहितेने घेतला गळफास
जळगावात आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, नेमका काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
8 वी ते ग्रॅज्युएशन पाससाठी बंपर नोकऱ्या, लवकर अर्ज करा, शेवटची तारीख जवळच
मध्य रेल्वेत 2422 जागांसाठी बंपर भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी
परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याचा गोल्डन चांन्स, या विभागात भरती
नराधम मित्राने देखील मैत्रीला काळिमा फासत मित्राच्या पत्नीला आणि तिच्या मुलीला चाकुचा धाक दाखवून जबरी अत्याचार केला आहे. या धक्कादायक घडल्यानंतर पीडित महिलेनं हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी पतीने यापूर्वी देखील चारित्र्यावर संशय घेत अनेकदा मानसिक त्रास दिल्याचा आरोप पीडितेनं आपल्या तक्रारीत केला आहे. यानंतर त्याने हद्दच पार करत मित्राकडून पत्नीवर बलात्कार घडवून आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही. या घटनेचा सविस्तर तपास हिंगोली ग्रामीण पोलीस करत आहेत.