जळगाव प्रतिनिधी | आमदार सुरेश भोळे यांच्यासह भाजपच्या १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाले आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलल्यामुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुधवारी टॉवर चौकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले यांचा फोटो असलेले बॅनर जाळले. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था बाधित झाल्याने पाेलिसांनी स्वत: फिर्यादी देऊन या दहा जणांवर गुन्हे दाखल केले.
हे सुद्धा वाचा :
दुर्दैवी ! लग्न काही दिवसांवर आले असताना नवरीचा अपघाती मृत्यू
8 वी ते ग्रॅज्युएशन पाससाठी बंपर नोकऱ्या, लवकर अर्ज करा, शेवटची तारीख जवळच
मध्य रेल्वेत 2422 जागांसाठी बंपर भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी
परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याचा गोल्डन चांन्स, या विभागात भरती
पटोले भंडारा जिल्ह्यात निवडणूक प्रचार करीत असताना पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह बोलले होते. या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासनाची परवानगी न घेता आंदोल केले. जमावबंदी, कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केले. त्यामुळे पोलिस कर्मचारी नरेंद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाजपचे आमदार सुरेश भोळे, महानगरप्रमुख दीपक सूर्यवंशी, सचिन पवार, राजेश भावसार, लालचंद पाटील, तुकाराम निकम, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह १० जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र सोनार हे पुढील तपास करीत आहेत.