रावेर : येथे शासकीय कामाचा कंत्राटी पध्दतीने घेतलेल्या कंत्राटदाराकरून दोन्ही कामांची बीले पास करण्यासाठी १ लाख १५ हजार रूपयांची लाचेची मागणी करणाऱ्या वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश हरी महाजन (वय ४५, रा. रावेर ता.जि.जळगाव) याच्याविरुद्ध याच्याविरुद्ध अखेर अखेर लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, तक्रारदार हे औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असून ते शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वनविभागकडून रावेर तालुक्यात ए.एन.आर. रोपवन अंतर्गत त्यांनी चेनसिंग फेनसिंग व गेटचे काम ऑनलाईन ई-टेन्डरींगच्या पध्दतीने घेतले होते. यापैकी त्यांनी दोन काम पुर्ण केले होते. कामाचा त्यांना अद्याप धनादेश मिळालेला नव्हता.
धनादेशाच्या मोबदल्याचे वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश हरी महाजन यांनी ५ टक्के कमिशनप्रमाणे १ लाख ३० हजार रूपयांची मागणी केली. तडजोडी अंत १ लाख १५ हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी लोकसेवक मुकेश हरी महाजन याच्यावर रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा…
BSNL चा ‘हा’ प्लॅन Jio, Airtel, Vi ला देतोय टक्कर ! कमी किमतीत मिळेल बरेच काही
साऊथ सुपरस्टार धनुषने 18 वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोबत घेतला घटस्फोट
रेल्वेत या पदांवर परीक्षेशिवाय मिळतील नोकऱ्या, लवकर अर्ज करा
या योजनेत दरमहा मिळेल 5,000 रुपये पेन्शन, करावी लागेल ‘इतकी’ गुंतवणूक
यांनी केली कारवाई
ही कारवाई नाशिक एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने केली.